पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट चे

पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय

  • NBA मान्यताप्राप्त महाविद्यालय
  • "A ग्रेड " सह NAAC मान्यता
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU), पुणे यांच्याशी कायमस्वरूपी संलग्न एक स्वायत्त(Autonomous) महाविदयालय
  • ISO 9001: 2015 प्रमाणित संस्था
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य सरकार , DTE, मुंबई द्वारा मंजूर
Spotlight
                         
मायबोली

पीसीसीओई मायबोली - विशेष आवड गट


पीसीसीओई मायबोली चे उद्दिष्ट


अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसोबत, अजून एक महत्वाची गरज मानवाला असते ती म्हणजे ' व्यक्त होण्याची...! ' आणि व्यक्त होण्यासाठी जे माध्यम वापरले जाते त्या ' भाषेची!' लहानपणी आईच्या सादाला प्रतिसाद देताना...आई ज्या भाषेत बोलते त्या भाषेचा आधार आपल्याकडून नकळत पणे घेतला जातो आणि मग तीच बनते आपली मातृभाषा: ' मायबोली '

आपल्या महाराष्ट्राची मायबोली म्हणजेच ' मराठी ' ही लोकभाषा म्हणून सुमारे सातशे वर्षापेक्षा जास्त काळापासून वापरात आहे. विविध संत, साहित्यिक, अभ्यासक, विचारवंत यांनी मराठी भाषा समृद्ध तर केलीच पण तिला राजभाषा आणि ज्ञानभाषा बनवण्याचा ही प्रयत्न केला. आज सुद्धा याच आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याचे प्रयत्न सुरू आहेत.

माझा मराठाचि बोलू कौतुके |
परि अमृतातेंही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन ||
असे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत मराठी भाषेचे पुनरुत्थान केले.....त्यावर कळस चढवण्याचे काम आज ही सुरू आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

गेली काही वर्षे आपण २७ फेब्रुवारी हा ' मराठी भाषा दिन '( वि. वा. शिरवाडकर जयंती ) म्हणून साजरा करतो. त्यानिमित्ताने मराठी भाषेचे संवर्धन आणि शाश्वतपणा यावर मंथन केल्या जाते. आज जगभरात सुमारे १२ कोटी मराठी भाषिक आहेत. आपण १२ कोटी मराठी भाषिकांनी ठरवले तर.....या आपल्या मायबोलीचा वारसा नक्कीच यशस्वीरित्या जपला जाईल.

आपल्या सर्वगुणसंपन्न अशा मायबोलीचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.
आज जरी ज्ञानभाषा इंग्रजी असली तरी अभिव्यक्तीचे माध्यम मात्र मराठीच आहे. ही अभिव्यक्ती कुटुंब, समाज, लोकजीवन आणि संस्कृती यांच्याशी जोडली गेलेली आहे.
" आपल्या सर्वांना अभिव्यक्ती साठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आणि मराठमोळ्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचा. " मायबोली चा उद्देश आहे.
आमची ही 'मायबोली ' तील धडपड तुम्हा- आम्हाला जोडून ठेवेल असा विश्वास वाटतो.


सल्लागार मंडळ


सल्लागार मंडळ

डॉ. गोविंद कुलकर्णी
संयोजक

सल्लागार मंडळ

प्रा. राजेंद्र जगताप
सहसंयोजक

सल्लागार मंडळ

डॉ. शितल भंडारी

सल्लागार मंडळ

डॉ. स्वाती शिंदे

सल्लागार मंडळ

डॉ. अनुराधा ठाकरे

सल्लागार मंडळ

डॉ. रचना पाटील

सल्लागार मंडळ

प्रा. अश्विनी वझे

सल्लागार मंडळ

प्रा. केतन देसले

सल्लागार मंडळ

डॉ. प्रिया जोशी